loader
Breaking News
Breaking News
Foto

गुणदे येथील सरस्वती शिक्षण संस्थेचे सचिव सुभाष पवार यांचे वृद्धापकाळाने निधन

खेड (प्रतिनिधी) - तालुक्यातील गुणदे येथील सरस्वती शिक्षण संस्थेचे सचिव सुभाष सखाराम पवार यांचे वृद्धापकाळाने सोमवार २५ मे २०२६ रोजी निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. गुणदे, आवाशी, शेल्डी पंचक्रोशीत सर्वांचे ते लाडके 'पवार भावोजी' म्हणून परिचित होते. लहान थोरांपासून सर्वजण त्यांना 'पवार भावोजी' म्हणूनच हाक मारत असत. अत्यंत शांत, समंजस, सात्विक, सोज्वळ, सोशिक, संतसम असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोकणात मूळ धरलेली आणि वहाळ येथे जोमदारपणे वाढलेली आपली निवासी अभ्यास वर्ग योजना अन्य ठिकाणी चांगल्या पद्धतीने रुजायला, विशेषतः गुणदे सारख्या दुसऱ्या तालुक्यातील गावात तिची पाळेमुळे रुजायला सुभाष पवार यांचे खूप मोठे सहकार्य लाभले होते. गुणदे येथे सुरू झालेल्या निर्धार निवासी वर्गाची मुहूर्तमेढ रोवण्यामध्येसुद्धा त्यांचे मोलाचे योगदान होते. चतुरंग प्रतिष्ठानचे विद्याधर निमकर यांनी सुभाष पवार यांच्या आकस्मिक निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

टाईम्स स्पेशल

एक भले, सज्जन, संतसम व्यक्तिमत्व जाण्याचे खूप दुःख होत असल्याने त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. गुणदे येथील स्मशानभूमीत सोमवारी रात्री ९ वाजता सुभाष पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगी, जावई व नात असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने गुणदे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg