loader
Breaking News
Breaking News
Foto

पनवेलमध्ये ‘पुरवैय्या’ सांगीतिक संध्याकाळ – बांगला संगीतकारांच्या हिंदी गाण्यांचा सुरांचा उत्सव

पनवेल(प्रतिनिधी) - रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल यांच्या वतीने आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख सहयोगाने ‘पुरवैय्या’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रम रविवार, दि. २८ जून रोजी रात्री ८ वाजता आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे संपन्न होणार आहे .बांगला संगीतकारांच्या मधुर हिंदी गाण्यांचा अनोखा सुरांचा उत्सव पनवेलकर रसिकांसाठी एक आगळा-वेगळा अनुभव ठरणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध कलाकारांचा सहभाग असून मुख्य निवेदक व सहआयोजक म्हणून पुष्कर श्रोत्री, गायक म्हणून अजित परब, अर्चना गोरे आणि मुक्ता जोशी तर निवेदिका व सह-आयोजिका म्हणून योगिनी पोफळे सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे लेखन प्रविण जोशी यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg