loader
Breaking News
Breaking News
Foto

रायपाटणचे तालुका क्रीडा संकुल नेमके कुठे?; भूमिपूजनानंतरही प्रकल्पाचा पत्ता नाही, क्रीडाप्रेमींचा सवाल

राजापूर / तुषार पाचलकर : राजापूर तालुक्यातील रायपाटण येथे प्रस्तावित तालुका क्रीडा संकुलाचे भूमिपूजन होऊन अनेक वर्षे उलटली, मात्र आजतागायत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे "रायपाटणचे तालुका क्रीडा संकुल नेमके कुठे आहे?" असा सवाल आता तालुक्यातील क्रीडाप्रेमी आणि खेळाडू उपस्थित करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सरीकडे, पाचल येथील हायस्कूलच्या मैदानावर वर्षभर तायक्वांदो, कबड्डी, क्रिकेट, रग्बी, खो-खो यांसह विविध क्रीडा प्रकारांचे नियमित प्रशिक्षण सुरू असते. तालुक्याच्या विविध भागांतील विद्यार्थी आणि खेळाडू येथे सरावासाठी येतात. अत्यल्प सुविधा आणि मर्यादित साधनसामग्री असूनही प्रशिक्षक आणि खेळाडू सातत्याने मेहनत घेत राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी तयारी करत आहेत. अशा परिस्थितीत, ज्या ठिकाणी प्रत्यक्ष क्रीडा उपक्रम मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत, त्या खेळाडूंना आजही तालुका स्तरावरील आधुनिक क्रीडा संकुलाची सुविधा उपलब्ध झालेली नाही. परिणामी, अनेक होतकरू खेळाडूंना दर्जेदार मैदान, आधुनिक प्रशिक्षण सुविधा आणि आवश्यक क्रीडा साहित्यापासून वंचित राहावे लागत आहे.

टाइम्स स्पेशल

रायपाटण येथील तालुका क्रीडा संकुलाच्या कामाची सद्यस्थिती काय आहे, प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आणखी किती कालावधी लागणार आणि तालुक्यातील खेळाडूंना या संकुलाचा प्रत्यक्ष लाभ कधी मिळणार, याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी आता क्रीडाप्रेमी, पालक आणि खेळाडूंमधून जोर धरू लागली आहे. क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी शासनाने जाहीर केलेले प्रकल्प केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात पूर्ण व्हावेत, अशी अपेक्षा राजापूर तालुक्यातील नागरिक व्यक्त करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg