लांजा (संजय साळवी) - रत्नागिरी जिल्ह्यातील अतिरिक्त पदवीधर शिक्षकांचा प्रश्न लांजा - राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्या माध्यमातून मार्गी लागल्याने शिक्षक वर्गातून समाधान व्यक्त केले जात असून आमदार किरण सामंत यांना विशेष धन्यवाद देण्यात येत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार शाळेतील मुलांच्या संख्येवर शिक्षकांची संख्या निश्चित करण्यात आली. कोकणात मागील काही वर्षात विद्यार्थी संख्या कमी झाल्याने नवीन निकषांनुसार शिक्षक संख्या सुद्धा कमी होणार आहे. यामध्ये जादा झालेले शिक्षक अन्य जिल्ह्यांत पाठविले जाणार होते. याबाबत शासन स्तरावर काहीतरी मार्ग काढावा यासाठी लांजातील काही शिक्षकांनी शिवसेना तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील कुरुप यांच्या माध्यमातून आमदार किरण सामंत यांची नुकतीच भेट घेतली. नवीन शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील जवळपास एक हजार पदवीधर शिक्षक अतिरिक्त होऊन जिल्ह्याबाहेर जातील याबाबत काही तरी मार्ग काढण्यात यावा अशी विनंती यावेळी त्यांच्याकडे करण्यात आली.
त्यानुसार आमदार किरण सामंत यांनी तात्काळ फोनवरून जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यासोबत चर्चा केली व या विषयात तातडीने रत्नागिरी येथे जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण विभागाचे प्रमुख अधिकारी यांच्यासोबत बैठक आयोजित केली. या बैठकीत पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली. हा विषय शासन स्तरावर असल्याने पालकमंत्री उदय सामंत यांनी तात्काळ फोनवरून राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा करून कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यातील सर्व मंत्री, आमदार व तीनही जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण विभागाचे अधिकारी यांची एकत्रित बैठक मंत्रालयात आयोजित केली.
या बैठकीत पालकमंत्री उदय सामंत तसेच आमदार किरण सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील पदवीधर शिक्षक याच जिल्ह्यात राहिले पाहिजेत, कोणालाही अन्य जिल्ह्यांत जायला लागणार नाही अशा पद्धतीने निर्णय करून घेतला. या ऐतिहासिक निर्णयामुळे आज रत्नागिरी जिल्ह्यासह रायगड व सिंधुदुर्ग जिल्हयातील अतिरिक्त सर्व पदवीधर शिक्षक आपल्या शाळेत, केंद्रात, बीटमध्ये किंवा तालुक्यातच राहणार आहेत. याबद्दल जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी पालकमंत्री उदय सामंत आमदार किरण सामंत यांना मनापासून धन्यवाद देत आभार व्यक्त केले आहेत.























































































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)









































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.