loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्गमध्ये नवीन मोबाईल टॉवर्स बसवा, अन्यथा उपोषण- मायकल लोबो

दोडामार्ग (प्रतिनिधी) - भारत संचार निगम लिमिटेड कंपनीने दोडामार्ग तालुक्यातील तेरवण मेढे तसेच इतर गावात दोन-अडीच वर्षे अगोदर मोबाईल सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मोबाईल टॉवर उभे केले पण सेवा दिली गेली नाही. त्या ठिकाणी दुसर्‍या खाजगी कंपनीची सेवा मिळते पण दूरसंचार निगम लिमिटेड मोबाईल टॉवर बंद आहेत. या ठिकाणी नवीन मोबाईल टॉवर कार्यान्वित करावे किंवा जुने बंद मोबाईल टॉवर सुरू करावे, यासाठी शुक्रवारी १ मे रोजी तेरवण मेढे मोबाईल टॉवरखाली उपोषणाला बसण्याचा इशारा तेरवण मेढे ग्रामपंचायत उपसरपंच व शिवसेना पदाधिकारी मायकल लोबो यांनी दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दोडामार्ग तालुक्यातील अनेक ठिकाणी भारत संचार निगम यांनी उभे केलेले मोबाईल टॉवर बंद आहेत पण ते सुरू करण्यासाठी प्रयत्न झाले नाही. वेळोवेळी लेखी निवेदन देऊन देखील दखल घेतली नाही. यामुळे भारत संचार मोबाईल सीमकार्ड धारकांना फटका बसत आहे. तेव्हा बंद मोबाईल टॉवर सुरू करण्यासाठी उपसरपंच मायकल लोबो यांनी महाराष्ट्रदिनी उपोषण करणार असल्याचे सांगितले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg