loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला उद्या पोलिओ प्रतिबंधक लस देणार ,मातांनो इकडे लक्ष्य द्या

मुंबई :राज्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून पोलिओमुक्त महाराष्ट्राची परंपरा राखावी. यासाठी सर्व पालकांनी रविवार, २८ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण’ मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे. या मोहिमेसाठी राज्यभरात ८९,४८९ लसीकरण बुथ, २६,५३० ट्रान्झिट पथके, १३,५१८ मोबाईल पथके आणि ५८६ रात्रपाळी पथके कार्यरत राहणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या मोहिमेत राज्यातील अंदाजे १ कोटी ३ लाख बालकांना सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत पोलिओ प्रतिबंधक बायव्हॅलेंट ओरल पोलिओ व्हॅक्सीन (bOPV) चे दोन थेंब पाजण्यात येणार आहेत. बुथवर येऊ न शकलेल्या बालकांचे शहरी भागात पुढील पाच दिवस आणि ग्रामीण भागात पुढील तीन दिवस आरोग्य कर्मचाऱ्यांकडून गृहभेटीद्वारे लसीकरण करण्यात येईल. तसेच प्रवासात असलेल्या बालकांसाठी ट्रान्झिट, मोबाईल आणि रात्रपाळीच्या विशेष पथकांमार्फतही मोहिमेच्या कालावधीत लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg