loader
Breaking News
Breaking News
Foto

यंदाही मुरुडमधील शासकिय कार्यालयांच्या गळतीला प्लॅस्टिकचा आधार: कायम स्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी बासनात

कोर्लई (राजीव नेवासेकर) - गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पावसाळा सुरु होतो तोच मुरुडमधील शासकिय कार्यालयांत होणाऱ्या गळतीला उपाय म्हणून छतावर प्लॅस्टिकचा वापर केला जातो आहे. यंदाही कार्यालयाच्या इमारतींना प्लॅस्टिक वापर केला जात असल्याने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी बासनात गुंडाळल्याचे समोर येत आहे. नेमेची येतो मग पावसाळा या प्रमाणे गेल्या काही वर्षांपासून पावसाळा सुरू होतो न होतो तोच मुरुडमधील तहसील कार्यालय, ग्रामीण रुग्णालयात गळती सुरू होते आणि या गळतीला उपाय म्हणून कार्यालयांच्या छतावर प्लॅस्टिकचा वापर केला जात असल्याचे मागील वर्षापासून दिसून येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुरुड तालुक्याचे ठिकाण असून या ठिकाणी तहसीलदार कार्यालय, वनविभाग, पंचायत समिती, सेतू, ग्रामीण रुग्णालय विविध कार्यालये असून काही कार्यालयात महत्त्वाचे दस्तावेज असतात. शहरासह तालुक्यातील विविध ठिकाणांहून शासकीय कामासाठी लोकांची लगबग असते. गेल्या काही वर्षांपासून पावसाळा सुरू झाला कि येथील कार्यालयांच्या गळतीला सुरुवात होते आणि मग त्यावर उपाय प्लॅस्टिकचा वापर केला जातो. त्या ऐवजी येथील काही कार्यालयात पावसाळ्यात होणारी गळती कायमस्वरुपी थांबण्यासाठी शासनाच्या संबंधित विभागाने लक्ष पुरवून योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी जनमानसातून जोर धरत असली तरी यंदाही शासकीय कार्यालयांच्या गळतीला प्लॅस्टिकचा वापर केला जात असल्याने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी बासनात गुंडाळल्याचे चित्र दिसून येत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg