loader
Breaking News
Breaking News
Foto

भारतासह अनेक देशामध्ये भूकंपाचे धक्के ,अफगाणिस्थान हादरले

नवी दिल्ली : भूकंपाची मोठी बातमी समोर येत आहे , दिल्ली-एनसीआर सह भारताच्या अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नॅशनल जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाचं केंद्र अफगाणिस्तानमधील हिंदूकुश क्षेत्रामध्ये 191 किलोमीटर एवढं खोल आहे. या भूकंपाची तीव्रता 6.2 रिस्टर स्केल एवढी नोंदवण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

समोर आलेल्या माहितीनुसार अफगाणिस्तानच्या हिंदूकुश क्षेत्रात शनिवारी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी 6.2 रिश्टल स्केल तीव्रतेचा भूंकप आला.राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र (National Centre for Seismology) ने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाचं केंद्र पूर्वोत्तर अफगाणिस्तानमधील कालाफगान पासून जवळपास 81 किलोमीटर दूर 36.442 ° उत्तर अक्षांश आणि 70.672 ° पूर्व रेखांशादरम्यान होते. या भूकंपाचे धक्के चीन, पाकिस्तान, ताजिकिस्तान, उज्बेकिस्तान, किर्गिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि भारतामध्ये जाणवले.

टाइम्स स्पेशल

दिल्ली एनसीआरमध्ये काही सेकंद या भूकंपाचे धक्के जाणवले, या भूकंपाच्या घटनेमध्ये अजूनपर्यंत तरी कुठलीही जीवितहानी अथवा वित्तहानी झाल्याची बातमी समोर आलेली नाहीये. तज्ज्ञांच्या मतानुसार या भूकंपाचा केंद्रबिंदु जमिनी खाली खूप खोल असल्यामुळे अनेक देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मात्र या भूकंपामुळे कुठेही फारस नुकसान झालेलं नाहीये. अफगाणिस्तानचा हिंदूकुश परिसर हा भूकंपप्रवण क्षेत्र आहे. या भागात यापूर्वी देखील अनेकदा भूकंपाच्या घटना घडल्या आहेत, अता पुन्हा एकदा या भागात 6.2 रिश्टल स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे. या भूकंपाचे धक्के भारतात देखील जाणवले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg