ठाणे (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत १५० दिवस कृती कार्यक्रमांतर्गत सर्व विभागांमध्ये कागदविरहित कामकाजाला मोठ्या प्रमाणात गती मिळाली आहे. प्रशासनातील सर्व फाईली ई-ऑफिस प्रणालीद्वारे तयार केल्या जात असून यामुळे कामकाजात पारदर्शकता, गती, तसेच ग्रामस्थांच्या विविध प्रश्नांचे जलद निराकरण प्रभावीपणे होत आहे. ठाणे जिल्हा परिषद आणि सर्व पंचायत समित्यांमध्ये ई-ऑफिस प्रणालीअंतर्गत झालेल्या कामकाजाची प्रगती उल्लेखनीय आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी- कर्मचारी यांचे ई-ऑफिस प्रणालीअंतर्गत युजर आयडी तयार करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेत १७ हजार १४६ ई-फाईल्स निपटारा करण्यात आल्या आहेत आणि ४६ हजार ५८९ ई-रिसीट्स (टपाल) तयार झाल्याची नोंद आहे. ही परिपूर्ण व प्रभावी आकडेवारी ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाच्या कागदविरहित, पारदर्शक आणि गतिमान डिजिटल परिवर्तनाची भक्कम पावले अधोरेखित करते.
ई-ऑफिस प्रणालीमुळे फाईल ट्रॅकिंग सुलभ व वेगवान, फाईलचा प्रवास कोणत्याही टप्प्यावर सहज तपासता येतो, विलंब होण्याची शक्यता कमी, पारदर्शक कामकाज, निर्णय प्रक्रियेला गती, नागरिकांच्या अर्ज, विनंत्या व तक्रारींचा जलद निपटारा “ई-ऑफिसमुळे जिल्हा परिषद प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि उत्तरदायी बनले आहे. फाईल ट्रॅकिंग, वेळेवर तपासणी आणि विलंब टाळण्यासाठी चर्चा करून त्वरित निर्णय घेणे शक्य झाले आहे. ग्रामस्थांच्या प्रश्नांचे निराकरण अधिक वेगाने होत असून डिजिटल बदल हा ठाणे जिल्ह्यासाठी परिवर्तनाचा नवा टप्पा आहे.” — उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन), जिल्हा परिषद ठाणे अविनाश फडतरे १५० दिवस कृती कार्यक्रमांतर्गत ठाणे जिल्हा परिषदेचे सर्व विभाग पूर्णपणे डिजिटल स्वरूपाकडे येत आहेत. कागदविरहित कामकाजामुळे पर्यावरण पूरक दृष्टिकोनही जपला जात आहे.




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.