देवळे (प्रकाश चाळके) - रत्नागिरी-नागपूर रस्त्यावरील संगमेश्वर तालुक्यातील देवळे फाट्यावर पॅसेंजरची वाट बघत उभी असलेल्या रिक्षाला अज्ञात वाहनाने मागून धडक दिली. या धडकेत रिक्षात असलेल्या चालकाचा रिक्षा बाहेर उडून जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवार सकाळी १०.३० च्या सुमारास घडली. चाफवली बौद्धवाडी येथील रिक्षा व्यवसायिक विजय पांडुरंग कांबळे वय (६२) आपली रिक्षा क्र . एमएच ०८ - एओ - २१९१ घेऊन नेहमीप्रमाणे रत्नागिरी नागपूर रस्त्यावरील देवळे फाटा येथे रिक्षा घेवून पॅसेंजरची वाट पाहत असताना अज्ञात वाहनाने मागून येऊन त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की यात रिक्षाचा मागच्या बाजूला चेंदा मेंदा केला झाला, आणि रिक्षात बसलेल्या विजय कांबळे रिक्षा बाहेर फेकले गेल्याने रस्त्यावर घासत त्यांचा मृत्यू झाला.
ही धडक एवढी गंभीर होती की रिक्षा फरपटत सुमारे दहा फूट पुढे गेली. अज्ञात वाहनाने धडकेनंतर आपली गाडी रिव्हर्स घेतली व कोल्हापूरच्या दिशेने पलायन केले असे सुमारे २५० ते ३०० फूट लांब असलेल्या रस्ता कामगारांनी सांगितले. ही गाडी स्कॉर्पिओ सदृश असून काळया रंगाची असल्याचे त्यांनी सांगितले. या रिक्षा जवळ संदीप अनंत कांबळे ही होते, परंतु लघुशंंकेसाठी त्याच वेळेत बाजूला गेल्याने ते परत येईपर्यंत ती गाडी सुसाट गेल्याने पूर्ण दिसली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. विजय कांबळे यांना त्वरित देवळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी नेण्यात आले परंतु डॉ. तुषार चोपडे यांनी त्यांना मृत घोषित केले. आ. भैय्या सामंत यांच्या ऍम्बुलन्सने विजय कांबळे यांचा मृतदेह शव विच्छेदनासाठी साखरपा प्रा.आ. केंद्रात नेण्यात आला.
यावेळी चाफवली, देवळे, दाभोळे, बौद्धवाडीतील तसेच देवळेतील रिक्षा चालक, चाफवली उपसरपंच विजय घुमे, देवळे पोलीस पाटील विजीत साळवी, शिवू शेटये, बंड्या परशेटये, दाभोळे उपसरपंच किरण दाभोळकर, उदय कांबळे उपस्थित होते. या अपघाताचे वृत्त समजताच देवरुख पोलीस निरीक्षक उदय झावरे, साखरपा दुरक्षेत्राचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्यक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे, पो. हवालदार सचिन पवार, पोलीस हवालदार सचिन कामेरकर हे त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास पोलीस यंत्रणेमार्फत चालू आहे. नागपूर रत्नागिरी महामार्गावर ज्या ठिकाणी अपघात झाला आहे त्याच्या बाजूने तीन मोठ्या गाड्या पास होऊ शकतात एवढा मोठा रस्ता असताना रस्त्याच्या साईट पट्टीच्या बाजूला उभी असलेल्या रिक्षाला सदर अज्ञात वाहनाने धडक दिली, यात रिक्षाचालकाची कोणतीही चूक नसताना नाहक जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.




























































































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)









































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.