loader
Breaking News
Breaking News
Foto

बोरजमध्ये २ मेपासून अखंड हरिनाम सप्ताह

खेड (प्रतिनिधी) - तालुक्यातील बोरज-शेवरवाडी येथील श्री राधाकृष्ण मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळ्यानिमित्त २ ते ४ मे याकालावधीत अखंड विश्वशांती हरिनाम सप्ताहसह विविधांगी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. २ मे रोजी सकाळी ८.३० वाजल्यापासून ध्वजरोहण, देवांचे मानपान विडे, महासंकल्प, स्थापित देवता पूजा व वास्तूशांती, आरती, पूजन, वहन, मंगल आरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद, दुपारी ३.३० वाजता बाळकृष्ण जंगम यांच्या निवासस्थानापासून श्री राधाकृष्ण मंदिरपर्यंत मूर्तीची मिरवणूक, सायंकाळी ६ वाजता हरिपाठ, श्री मूर्तीना जलादिवास, हरिकीर्तन, रात्री महाप्रसाद, धान्यादिवास, श्री हरी जागर व निद्रावास, भजन, जागर होईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

३ रोजी सकाळी ८ वाजता स्थापित देवता पूजन, घटस्थापना, सकाळी ११.३० वाजता हवन, प्राणप्रतिष्ठा, कळशारोहण श्री क्षेत्रवाई येथील श्रीगुरू ष.ब्र.१०८ महादेव शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते श्रीं ची स्थापना व प्राणप्रतिष्ठा व कळशारोहण, दुपारी १२.३० वाजता हभप मोगरे गुरूजी यांच्या हस्ते घटस्थापना, मंगल आरती, दर्शनसोहळा, दुपारी १ वाजता महाप्रसाद, २ वाजता बोरज-शेवरवाडीतील नॅशनल अकॅडमी कॅम्पतर्फे पंचक्रोशीतील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम होईल. दुपारी ३ वाजता श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी प्रवचन, हरिपाठ, हरिकीर्तन, रात्री ९ वाजता महाप्रसाद, १०.३० वाजता 'भाऊबीज' वगनाट्य तर ४ रोजी पहाटे ४ वाजता काकडा आरती, सकाळी महापूजा, काल्याचे कीर्तन, दुपारी १२ वाजता महाप्रसाद होणार आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg