दोडामार्ग, दि. २६ मे प्रतिनिधी कुडासे वानोशी येथील तिलारी नदी पाञात मंगळवारी आंघोळ करण्यासाठी चार जणांचा ग्रुप आंघोळ करण्यासाठी आले असता मुंबई स्थित शाळकरी विद्यार्थी कु. वेंदात सचिन सांगेलकर, वय वर्षे १३ याचा बुडून दुदैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दोडामार्ग तालुक्यात मे महिन्यातील ही पहिली घटना आहे. या अगोदर देखील कुडासे वानोशी नदी पाञात आंघोळ करण्यासाठी उतरलेल्या अनेक जणांचा या अगोदर देखील बळी गेला आहे. मंगळवारी साडेचार वाजता ही घटना घडली. अखेर स्थानिक ग्रामस्थ यांनी वेंदात सांगेलकर याचा मृतदेह बाहेर काढून साटेली भेडशी आरोग्य केंद्र येथे आणला. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी तपासणी केली असता मृत घोषित केले. या नंतर दोडामार्ग पोलीस याना माहिती दिली.
मुंबई दादर येथील स्थायिक वेदांत सचिन सांगेलकर हा दोडामार्ग येथे आपल्या आजीकडे उन्हाळी सुट्टी मध्ये राहायला आला होता. तर आईवडील मुंबई येथे असतात वेंदात सचिन सांगेलकर तसेच इतर तिघे असे चार जण आंघोळ करण्यासाठी नदी पाञात उतरले यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने वेंदात सचिन सांगेलकर हा खोल पाण्यात बुडाला. या नंतर आरडाओरडा केला या नंतर ग्रामस्थ धाऊन आले. पाण्यात उतरून त्याला बाहेर काढले
वेंदात सचिन सांगेलकर त्याचा भाऊ तसेच इतर नातेवाईक असे चार जण आंघोळ करण्यासाठी गेले होते. यावेळी ही दुदैवी घटना घडली. घटनेची माहिती मिळताच दोडामार्ग पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे, पोलीस बाबी देसाई, इतर साटेली भेडशी आरोग्य केंद्र येथे दाखल झाले. मृत मुलगा याचे आईवडील याना कळविण्यात आले आहे. ते यायला निघाले आहेत. वेंदात सचिन सांगेलकर याचा बुडून मृत्यू झाला ही वाईट बातमी समजताच त्याची आजी इतर नातेवाईक साटेली भेडशी आरोग्य केंद्र येथे दाखल झाले. यावेळी आजीने टाहो फोडला.































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.