loader
Breaking News
Breaking News
Foto

गॅस सिलेंडर वितरणातील मनमानी कारभाराविरोधात उपोषण; प्रशासनाच्या आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित

कर्जत (जयेश जाधव) - तालुक्यातील गॅस सिलेंडर वितरणातील मनमानी कारभारा विरोधात पोलीस मित्र संघटनेचे उपाध्यक्ष रमेश कदम यांनी केलेले उपोषण प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर एका दिवसांतच तुतार्स स्थगित करण्यात आले. ग्राहकांना वेळेत गॅस सिलेंडर मिळत नसल्याने तसेच भारत गॅस एजन्सीच्या भोंगळ व मनमानी कारभारामुळे हे आंदोलन छेडण्यात आले होते. रमेश कदम यांनी २९ एप्रिल रोजी कर्जत येथील भारत गॅस एजन्सीसमोर सकाळी उपोषण सुरू केले होते. गॅस एजन्सीकडून ग्राहकांना वेळेत सिलेंडर मिळत नाही, बुकिंगनंतर विलंब होतो, तसेच सण-उत्सव, धार्मिक कार्यक्रम आणि लग्नसमारंभासाठीही सिलेंडर उपलब्ध करून दिले जात नाहीत, अशा प्रमुख तक्रारी त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यामध्ये ग्राहकांना एजन्सीसमोर पिण्याच्या पाण्याची, बसण्याची व निवाऱ्याची व्यवस्था नसल्याने ग्राहकांना तासनतास उन्हात उभे राहावे लागत होते, हि बाब त्यांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारीद्वारे मांडली होती. याबाबत त्यांनी एक लेखी निवेदन तहसीलदार, पुरवठा विभागाकडे सुपूर्द केले होते. अखेर उपोषणकर्ते रमेश कदम यांच्या या उपोषणाची दखल घेत पुरवठा अधिकारी रवींद्र दळवी यांनी कदम यांच्याशी चर्चा करून लेखी आश्वासन दिले. तसेच संबंधित गॅस एजन्सीकडूनही ग्राहकांच्या सोयीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे व सुधारणा करण्याचे आश्वासन देण्यात आले.

टाइम्स स्पेशल

इतर गॅस एजन्सीकडूनही याबाबत लेखी पत्र घेण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. या प्रमुख मागण्यामध्ये गॅस सिलेंडर बुकिंगचा कालावधी ४५ दिवसांवरून २५ दिवसांवर आणण्याबाबतचा निर्णय केंद्र शासनाच्या अखत्यारीत असल्याने त्यासाठी काही कालावधी लागू शकतो. मात्र एजन्सी स्तरावर सुविधा सुधारण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. प्रशासनाच्या या आश्वासनानंतर रमेश कदम यांनी आपले उपोषण तात्पुरते स्थगित केले असून, पुढील काळातही मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg