loader
Breaking News
Breaking News
Foto

खुनाचा आरोप असणाऱ्या आरोपींची जामीनावर मुक्तता

खेड (प्रतिनिधी) - खेड तालुक्यातील मेटे येथिल गणि इस्माईल बोट, कादिर शमशुद्दीन घारे , अशरफ मोहंमद बोट, यांचे विरुद्ध खून केल्याचा आरोप ठेवून पोलिसांनी 23 एप्रिल 2026 रोजी अटक केली होती. मयत इसम शफी अब्दुल्ला वरवटकर राहणार मेटे मोहल्ला तालुका खेड यास या तिघांनी बेदम मारहाण केली होती. त्यांनी त्याच्या छातीत हाताने बुक्क्याने लाथेने मारहाण केली होती. तसेच तो पडला होता त्याची पत्नी व इतर मंडळी त्याला वाचवायला पाहत होते. तरीही पडल्यानंतर देखील त्याला लाथा भुक्क्यांनी छातीवर बरगड्यांवर मारत होते. त्यामुळे सदर इसमाचा मृत्यू झाला. त्यामुळे खेड पोलिसांनी त्यांच्यावर 105 3 कलमान्वये गुन्हा दाखल केला व खुनाचा आरोप ठेवला. या कामी सर्व आरोपींतर्फे ऍडव्होकेट सुधीर शरद बुटाला यांनी खेड जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. त्या कामी ऍडव्होकेट सुधीर शरद बूटाला यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून सदर आरोपींची जामीनावर मुक्तता करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg