loader
Breaking News
Breaking News
Foto

अरबाज नेवरेकर समाजरत्न पुरस्काराने सन्मानित ---

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर)- लांजा शहरातील सामाजिक कार्यकर्ते अरबाज हाजिमीया नेवरेकर यांना योगदान पोर्टल न्यूज व स्नेहलोक फाऊंडेशन यांच्यावतीने समाज रत्न पुरस्काराने कोल्हापूर येथे सन्मानित करण्यात आले योगदान पोर्टल न्यूज च्या प्रथम वर्धापन दिनानिमित स्नेहलोक फाऊंडेशनच्या वतीने सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अरबाज नेवरेकर यांनी कोरोना काळात गरजूंना मदतीचा हात दिला, समाज सेवेत मोलाचा वाटा उचलला, गरजूना किराणा पुरविणे, आधार देणे, ब्लडची आवश्यकता भासल्यास उपलब्ध करून देणे ही महत्त्वाची भुमिका बजावली. या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन समाजसेवा रत्न पुरस्कार अरबाज नेवरेकर यांना मान्यवरांच्या हस्ते कोल्हापूर येथे प्रदान करण्यात आला. अरबाज नेवरेकर यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg