केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर)- लांजा तालुक्यातील वेरवली बेर्डे वाडी धरणाला करोडो रुपये खर्च करून जवळ जवळ 40 वर्ष लोटली तरी वेरवली धरण प्रकल्पातून वेरवली गावाला पाणी मिळाले नव्हते. पाण्यासाठी उजवा आणि डावा कालवा होऊन देखील गावातील नागरिकांना पाणी मिळत नसल्याने अखेर आमदार किरण सामंत याच्याकडे ग्रामस्थांनी मागणी करताच आमदार सामंत यांच्या प्रयत्नांमुळे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आल्यामुळे वेरवली बुद्रुक गावातील सर्वच वाड्यांना पाणी मिळू लागले आहे. चाळीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पाणी मिळाल्याने ग्रामस्थातून समाधान व्यक्त केले जात असून आमदार किरण सामंत यांना धन्यवाद दिले जात आहेत.
धरणाच्या माध्यमातून वेरवली बुद्रुक परिसरातील 1081 जमीन क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट आहे. या धरणाचे 1983 साली भूमिपूजन होऊन वेरवली धरणाच्या कामाला सुरुवात झाली तब्बल 40 वर्ष झाली तरिही येथील ग्रामस्थांना पाणी मिळालेले नाही. धरण जवळ असताना येथील ग्रामस्थांना विकत पाणी घेणे भाग पडत होते. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती उद्भभवली होती. धरण जवळ असताना येथील ग्रामस्थांना पाणी विकत घेण्याची पाळी येत असल्याने आमदार कीरण सामंत यांची येथील ग्रामस्थांनी भेट घेऊन या संदर्भातील माहिती दिली व निवेदनाद्वारे तक्रार करून पाण्याची मागणी केली. त्यानंतर आमदार किरण सामंत यांनी तातडीने कार्यवाही सुरू केली. किरण सामंत याच्या प्रयत्नांमुळे डाव्या बाजूच्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. वेरवली बुद्रुक गावातील सर्वच वाड्यांपर्यंत पाणी पोहचले असून वेरवली बुद्रुक गावातील विहीरींना पाणी वाढले आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.