वरवेली (गणेश किर्वे) - चिपळूण तालुक्यातील खेरशेत गावचे सुपुत्र, लेखक, सामाजिक कार्यकर्ते तथा गुहागर पंचायत समितीतील कनिष्ठ लेखाधिकारी मिलिंद कदम यांना मुंबईस्थित आर्या रवी एंटरटेनमेंटतर्फे प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा 'अजेय लेखणी' पुरस्कार जाहीर झाला आहे.
आर्या रवी एंटरटेनमेंटतर्फे दरवर्षी साहित्य, समाजकारण, कला, संस्कृती आदी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येतो. मिलिंद कदम यांनी शासकीय सेवेत कार्यरत असतानाच सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला असून, विविध वृत्तपत्रांमधून समकालीन विषयांवर परखड लेखन करत समाजप्रबोधनाचे कार्य सातत्याने केले आहे.
त्यांच्या साहित्यिक आणि सामाजिक योगदानाची दखल घेत यंदाचा 'अजेय लेखणी' पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आहे. लवकरच मुंबई येथे आयोजित विशेष समारंभात मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दरम्यान, पुरस्कार जाहीर झाल्यानंतर साहित्य, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांसह मित्रपरिवाराकडून मिलिंद कदम यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





































2.jpg)































































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.