खेड (प्रतिनिधी) - शिवसेना महिला आघाडीच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने खेड येथील नेहा निरंजन दळी यांची शिवसेना महिला आघाडीच्या खेड शहर महिला संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीनंतर नेहा दळी यांनी शिवसेना नेते तथा माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांची मंडणगड येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
यावेळी रामदासभाई कदम व ज्योती रामदास कदम यांनी नूतन शिवसेना खेड शहर महिला संघटक नेहा दळी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच महिला आघाडीच्या संघटनात्मक विस्ताराबाबत मार्गदर्शन करत पक्षाची भूमिका तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी महिलांनी सक्रियपणे कार्य करण्याचे आवाहन केले. नेहा दळी यांनी पक्ष नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत खेड शहरात महिला आघाडी अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
या प्रसंगी खेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा माधवी बुटाला, नगरसेविका संजना कुडाळकर, दिप्ती शिगवण, रसिका खेडेकर, रेश्मा खतीब, दिप्ती तोडकरी, अश्विनी वडके, संपदा गुजराथी, श्वेता चिखले,फातिमा मुसा, आरती खेडेकर, मीरा चिखले, रश्मी पाटणे, सई पाटणे, मीनल गांधी, श्रेया जोशी, नूतन सावंत, श्रद्धा कवळे, चित्रा दांडेकर, स्वरा कवळे, सुप्रिया जोगळे, सुप्रिया चव्हाण, नमिता माळी, तसेच शिवसेना महिला आघाडीच्या अनेक पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.





































2.jpg)































































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.