loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हा परिषद चिखली बौद्धवाडी शाळेच्या अंगणातील धोकादायक वीज पोल हटविला

संगमेश्वर (प्रतिनिधी) - तालुक्यातील चिखली बौद्धवाडी येथील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीच्या आवारात अनेक वर्षांपासून उभा असलेला धोकादायक वीज पोल अखेर हटविण्यात आला आहे. या पोलमुळे विद्यार्थी आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. ग्रामस्थांनी वारंवार मागणी करूनही कार्यवाही होत नसल्याने हा विषय कडवई प्रभाग समितीच्या बैठकीत सामाजिक कार्यकर्ते सचिन कदम यांनी विषय उपस्थित केला होता. जिल्हा परिषद सदस्य तथा माजी अध्यक्ष संतोष थेराडे आणि पंचायत समिती सदस्या अपर्णा अरविंद जाधव यांनी बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांकडे हा प्रश्न ठामपणे मांडत धोकादायक पोल तात्काळ हटविण्याची मागणी केली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच पंचायत समिती देवरुखच्या मासिक सभेतही अपर्णा जाधव यांनी हा मुद्दा उपस्थित करून त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले होते. या पाठपुराव्याची दखल घेत महावितरणने धोकादायक पोल हटवून आवश्यक ती कार्यवाही पूर्ण केली. त्यामुळे शाळा आणि अंगणवाडी परिसरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला असून पालक व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. कडवई प्रभाग समितीच्या बैठकीत विविध विकासकामांबाबत घेतलेल्या निर्णयांनंतर अनेक प्रलंबित प्रश्नांना गती मिळाली आहे.

टाईम्स स्पेशल

संबंधित विभागांना चौकशी व कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर धोकादायक पोल हटविण्याची कार्यवाही पूर्ण झाल्याने स्थानिक नागरिकांनी जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे, पंचायत समिती सदस्या सौ. अपर्णा अरविंद जाधव तसेच महावितरणचे अधिकारी योगिनाथ गोरे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg