loader
Breaking News
Breaking News
Foto

कसबा ग्रामपंचायतीत एकल महिला दिन उत्साहात; बचत गट, गृहउद्योग व शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन

संगमेश्वर (प्रतिनिधी) : महिलांनी बचत गटांमध्ये सहभागी होणे ही काळाची गरज असून बचत गट हे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून स्वावलंबी बनविणारे प्रभावी माध्यम आहे. बचतीची सवय, कर्जाची सुविधा, गृहउद्योगासाठी भांडवल, तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊन महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे, असे प्रतिपादन पंचायत समितीच्या सभापती शर्वरी वेल्ये यांनी केले. कसबा ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित एकल महिला दिन कार्यक्रमात त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. यावेळी सरपंच पूजा लाणे उपस्थित होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आपल्या मार्गदर्शनात सभापती शर्वरी वेल्ये यांनी महिलांनी बचत गटांमधून आर्थिक शिस्त अंगीकारून लघु व गृहउद्योग सुरू करावेत, त्यासाठी आवश्यक भांडवल कशा प्रकारे उपलब्ध करून दिले जाते, तसेच शासनाच्या विविध महिला कल्याण, स्वयंरोजगार व उद्योजकता योजनांची सविस्तर माहिती दिली. विशेषतः एकल महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येत स्वतःचा व्यवसाय उभारून आर्थिक स्वावलंबन मिळवावे, असे आवाहन त्यांनी केले.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमात यशदाच्या मास्टर ट्रेनर शेलार तसेच कसबा प्रभाग समन्वयक नाझरे यांनी 'उमेद' अभियानांतर्गत बचत गटांचे महत्त्व, त्यातून मिळणारे आर्थिक व सामाजिक लाभ, तसेच महिलांचे सक्षमीकरण याविषयी मार्गदर्शन केले. एकल महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ कसा मिळवता येईल, याबाबतही त्यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी उपस्थित विधवा महिलांचा हळदी-कुंकू समारंभ करून त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने एकल महिला उपस्थित होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg