loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी स्कूलमध्ये जे.ई.ई. मेन्स, ॲडव्हान्स, आय. एम. यू व सी. ई. टी. (पी. सी. एम.) परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न

खेड (प्रतिनिधी) - रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025- 26 मधील जे. ई. ई. मेन्स, ॲडव्हान्स, आय. एम. यू व सी. ई. टी. (पी. सी. एम.) परीक्षा उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सदरच्या कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. तद्नंतर प्रमुख मान्यवर कोकण विभाग एम. के. सी. एलचे समन्वयक संतोष कोलते, एम. के. सी. एल विभागप्रमुख विकास कदम यांचे स्वागत रोटरी स्कूलचे चेअरमन बिपीनदादा पाटणे यांनी शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व भेटवस्तू देऊन केले. तसेच जे. ई. ई. ॲडव्हान्स परीक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादित केलेले रोटरी स्कूलचे माजी गुणवंत विद्यार्थी धनंजय धुमाळ, सार्थक दिंडे, केवल खापरे, अथर्व चव्हाण, कौस्तुभ धुत्रे व साहिल अंगज यांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन करण्यात आले. तद्नंतर शैक्षणिक वर्ष 2025 -26 मधील जे. ई. ई. मेन्स, ॲडव्हान्स, आय. एम. यू व सी. ई. टी. (पी. सी. एम.) परीक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादित केलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमप्रसंगी प्रमुख मान्यवर संतोष कोलते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास, वेळेचे प्रभावी नियोजन आणि सातत्यपूर्ण मेहनत यांचा अंगीकार करणे आवश्यक आहे. नवीन ज्ञान आत्मसात करण्याची जिज्ञासा कायम ठेवावी आणि प्रत्येक संधीचा सकारात्मक दृष्टिकोनातून स्वीकार करावा. ज्ञानासोबतच शिस्त, प्रामाणिकपणा, जबाबदारीची जाणीव, आत्मविश्वास, चिकाटी आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी ही मूल्येही विद्यार्थ्यांनी जोपासली पाहिजेत. अपयशाला न घाबरता त्यातून शिकण्याची वृत्ती ठेवून आपल्या ध्येयाच्या दिशेने सातत्याने प्रयत्न करत राहिल्यास यश निश्चित मिळते, असे सांगून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच पालकवर्गामध्ये विजय चव्हाण यांनी जे. ई. ई. ॲडव्हान्स परीक्षेत विद्यार्थ्यांनी जे उत्तुंग यश प्राप्त केले ते केवळ रोटरी स्कूलमुळेच शक्य झाले आहे. त्याबद्दल आम्ही रोटरी शाळेचे सदैव कृतज्ञ आहोत असे सांगितले. अभ्यासाचे स्वतंत्र वेळापत्रक तयार करून त्याचे काटेकोरपणे पालन करा, असे सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

त्यानंतर धनंजय धुमाळ, सार्थक दिंडे, केवल खापरे या गुणवंत विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जे. ई. ई. ॲडव्हान्स परीक्षेत आपण जे यश मिळविले आहे त्यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती, मार्गदर्शक प्राध्यापक, पालक व मित्र यांचा मोलाचा वाटा आहे. इ. 12 वी नंतरच्या व्यावसायिक स्पर्धा प्रवेश परीक्षांची तयार करताना आपले स्वतःचे वेळापत्रक तयार करावे. विद्यार्थ्यांनी जे. ई. ई. ॲडव्हान्स, एम.एच.टी. सीईटी, यांसारख्या प्रवेश परीक्षांची तयारी कशापद्धतीने करावी ? अभ्यासात आपल्याला येणाऱ्या शंकांचे मार्गदर्शकांकडून निरसन करून घ्यावे. यश प्राप्त करताना सहनशिलता अंगी बाळगावी, असे सांगितले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. धनुजा धूत व कुणाल मंडलिक यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg