loader
Breaking News
Breaking News
Foto

कळंबस्ते मलदेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना अभिषेक वीर यांसकडून सलग तिसऱ्या वर्षी शैक्षणिक साहित्य भेट

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - तालुक्यातील कळंबस्ते मलदेवाडी, येथील पुर्ण प्राथमिक मराठी शाळा येथे संगमरत्न फाउंडेशन NGO च्या ‘संगम ज्ञानाचा, वारसा गडाचा’ या उपक्रमांतर्गत प्रचितगड मुखपृष्ठ असलेल्या १०,००० वह्यांच्या वाटप संकल्पाला सुरुवात झाली असून, त्याच अनुषंगाने “माझ्या गावातील मराठी शाळा म्हणजेच माझी जबाबदारी” या भावनेतून कै. सोमा रावजी वीर यांच्या स्मरणार्थ अभिषेक वीर यांसकडून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा, कळंबस्ते मलदेवाडी येथील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व १८ विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी आवश्यक शालेय वस्तू संच भेट देण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर कार्यक्रम शनिवार, २७ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता शाळेच्या परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि शिक्षणासाठी मिळालेल्या या आधारामुळे उपस्थितांचे मन भारावून गेले. यावेळी अभिषेक वीर, विजय मोहिते, महाडिक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामस्थ तसेच मुंबईकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी संगमरत्न फाउंडेशनच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचे कौतुक करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या या उपक्रमाला प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.

टाईम्स स्पेशल

ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा मिळावी, मराठी शाळांबद्दल आत्मीयता वाढावी आणि गड-किल्ल्यांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचावा या उद्देशाने राबविण्यात येणारे संगमरत्न फाउंडेशनचे हे कार्य समाजासाठी निश्चितच आदर्शवत ठरत आहे. तसेच सलग तिसऱ्या वर्षी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट देत अभिषेक वीर यांनी सामाजिक बांधिलकीचे जिवंत उदाहरण निर्माण केले आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg