खेड - रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या एका व्यक्तीवर खेड पोलिसांनी कारवाई केली आहे. दिनांक २६ जून रोजी रात्री १०.०१ वाजण्याच्या सुमारास खेड रेल्वे स्टेशनजवळील वेरळ येथे ही कारवाई करण्यात आली. सतीश तुकाराम भोसले (वय ४३, रा. तिसंगी, ता. खेड, जि. रत्नागिरी) असे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
या घटनेबाबत खेड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका महिला पोलीस शिपायाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेरळ येथील रेल्वे स्टेशन परिसरात आरोपी सतीश भोसले हा सार्वजनिक ठिकाणी बसून दारू पीत असताना गस्तीवर असलेल्या पोलिसांना रंगेहात मिळून आला. याप्रकरणी रात्री उशिरा ११.२४ वाजता खेड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ च्या कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान कोणताही मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला नाही. खेड पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.








































2.jpg)































































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.