loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई गोवा महामार्गावरील घर धोकादायक स्थितीत, प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज

संगमेश्वर - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (NH-66) हा कोकणातील महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग असला तरी, सध्या सुरू असलेल्या रुंदीकरणाच्या कामामुळे अनेक ठिकाणी गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. अपूर्ण बांधकाम आणि ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.म्हाबळे, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी येथील घरमालक वसंत सोमा खापरे यांचे घर सध्या अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात माती घसरल्याने घराच्या पाया खालील जमीन कोसळली आहे. तसेच नुकत्याच पडलेला पावसाचा मुरमा जमनी खाली येऊन माती बाहेर रस्त्यावर आल्याचे देखील चित्र आहे. आत्ता जरी पावसाची विश्रांती असली तरी पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर होत असून, घर कधीही ढासळण्याची भीती निर्माण झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात अनेक तांत्रिक अडचणी आढळून येत आहेत. योग्य पद्धतीने रिटेनिंग वॉल (आधारभिंत) न बांधणे, पावसाच्या पाण्याचा निचरा (ड्रेनेज) व्यवस्थित न करणे, उतार स्थिर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना न करणे अशा त्रुटी अनेक ठिकाणी दिसून येत आहेत. यामुळे माती घसरण (landslide) होण्याचे प्रमाण वाढले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच, काही ठिकाणी काम अर्धवट सोडण्यात आले असून, संरक्षणात्मक उपाय न करता काम थांबवण्यात आल्याने नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. स्थानिकांच्या मते, ठेकेदारांकडून सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन होत नसल्याने आणि देखरेखीचा अभाव असल्याने अशा घटना घडत आहेत. स्थानिकांनी तात्पुरत्या उपाययोजना म्हणून प्लास्टिक व दगडांचा आधार दिला असला तरी, हा उपाय अपुरा असून दीर्घकालीन तोडगा नाही. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हजिकच कोकणातील पावसाचे पर्जन्यमान पाहता या घरामधील जीवितहानीचा देखील धोका वाढत आहे. 

टाइम्स स्पेशल

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ तपासणी करणे गरजेचे आहे. तसेच, जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागांना आदेश देऊन योग्य तांत्रिक उपाययोजना—जसे की मजबूत आधारभिंत उभारणे, जलनिचरा व्यवस्था सुधारणे आणि उतार स्थिर करणे—त्वरित राबविण्याची आवश्यकता आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg