loader
Breaking News
Breaking News
Foto

अमेरिकेस्थित माजी विद्यार्थ्यी सागर निगुडकर यांनी जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा, निगुडे क्र. १ व अंगणवाडी येथे विद्यार्थ्यांना केले छत्र्यांचे वाटप

बांदा (प्रतिनिधी) : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, निगुडे नं. १,२ व अंगणवाडी येथील सर्व विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थी सागर निगुडकर यांच्या पुढाकारातून छत्र्यांचे व खाऊ वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक सावंत यांनी केले यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे इन्सुली पंचायत समिती सदस्य सदाशिव राणे, निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर, निगुडे माजी सरपंच समीर गावडे, माजी उपसरपंच गुरुदास गवंडे, शाळा व्यवस्थापन उपाध्यक्षा निधी गावडे, सदस्य संजना केसरकर, संतोष राणे, उद्योजक नारायण राणे, शाळेचे मुख्याध्यापक नारायण नाईक, शिक्षक कांदे, शिक्षिका देसाई, माजी विद्यार्थी, गंधाली निगुडकर, पल्लवी निगुडकर आदी उपस्थित होते, यावेळी माजी विद्यार्थी सागर निगुडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मी जरी आज अमेरिकेत असलो तरी या शाळेतूनच शिकून मोठा झालो. त्यामुळे माझं अंगणवाडीपासून सातवीपर्यंत बालपण हे गावातच झालं माझ्या शाळेला काही देणं लागतो म्हणून आज एक छोटासा उपक्रम मी केला यापुढेही करेन आपण शिका मोठे व्हा आणि आपल्या गावाचं नाव उज्वल करा, असं त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्याचप्रमाणे समीर गावडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व लहानपणी आम्हाला आई वडील सांगायचे की साता समुद्रापार जायचं परंतु आज आपल्यातीलच एक माजी विद्यार्थी सागर निगुडकर हे साता समुद्रा पार गेले परंतु त्यांनी आपल्या शाळेला विसरले नाहीत त्यामुळे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी, यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पंचायत समिती सदस्य सदाशिव राणे यांनी या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना पावसापासून संरक्षण मिळणार असून माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेबद्दल जपलेली आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी पुन्हा अधोरेखित झाली.

टाईम्स स्पेशल

यावेळी विद्यार्थ्यांना नियमित शाळेत उपस्थित राहणे, मन लावून शिक्षण घेणे आणि शाळेचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन केले. शाळेत आल्यानंतर मी प्रथमतः जे नादुरुस्ती वर्ग खोल्या आहेत. त्याची पाहणी केली. पंचायत स्तरावर आपल्या शाळेला जेवढं काही देता येईल त्या संदर्भात मी पाठपुरावा करेल असा आत्मविश्वास उपस्थित सर्वाना दिला. एकूण गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा एक व दोन तसेच तीनही अंगणवाडी असे मिळून ८४ छत्र्या व खाऊवाटप माजी विद्यार्थी सागर निगुडकर यांनी केले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, ग्रामस्थ आणि पालकांनी माजी विद्यार्थी सागर निगुडकर यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करून त्यांचे आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg