loader
Breaking News
Breaking News
Foto

वैभववाडीत बांधकाम सभापती रणजीत तावडे यांच्या कारची तोडफोड, अज्ञाताविरोधात तक्रार दाखल

वैभववाडी (प्रतिनिधी) - वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीचे बांधकाम सभापती रणजीत तावडे यांच्या व्हॅगनार कारची अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी उघडीस आली असून याप्रकरणी तावडे यांनी वैभववाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या घटनेमुळे वैभववाडी शहरात खळबळ उडाली आहे. रणजीत तावडे यांचे वैभववाडी बाजारपेठेत चायनीज सेंटर आहे. सोमवारी रात्री सुमारे १२ वाजण्याच्या दरम्यान त्यांनी आपला व्यवसाय बंद करून घरी गेले. त्यांच्या घराकडे जाणार्‍या रस्त्याचे काम सुरू असल्याने त्यांनी घरापासून काही अंतरावर रस्त्याच्या कडेला आपली व्हॅगनार गाडी उभी केली होती.

टाईम्स स्पेशल

त्यानंतर रात्री १२.३० वाजता सुमारास त्यांचा भाऊ घरी आला असता गाडी सुस्थितीत होती. मात्र मंगळवारी सकाळी नळ कामगारांच्या निदर्शनास गाडीची मागची काच फोडलेली आढळली. त्यांनी तात्काळ त्याची माहिती तावडे यांना दिली. घटनास्थळी पाहणी केल्यानंतर तावडे यांनी वैभववाडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात रीतसर तक्रार दाखल केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg