loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी समता प्रेरणाभूमीला राष्ट्र सेवा दलाच्या सायकल रॅली ची भेट

सावंतवाडी (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी सेवा दला मार्फत सागर ते सह्याद्री अशा पर्यावरणाच्या रक्षणासाठी व प्रदूषण मुक्तीचा संदेश घेऊन सुरू असलेल्या सायकल रॅली ने मंगळवारी सकाळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या समता प्रेरणाभूमीला (आंबेडकर स्मृती उद्यान) भेट देऊन अभिवादन केले. प्रारंभी समता प्रेरणाभूमी संवर्धन समितीचे सचिव मोहन जाधव यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून 22 ऑक्टोबर 1932 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली ही पुण्यभूमी ही आम्हा सर्वांचीच प्रेरणाभूमी असून त्या प्रेरणाभूमीचे रूपांतर राष्ट्रीय स्मारकात होण्यासाठी आमचा संकल्प असून येत्या शतक महोत्सवी वर्षात हे स्वप्न आपल्या सर्वांच्या सहकार्याने साकार करण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले व बाबासाहेबांच्या भेटीचा प्रसंग कथन केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याच अनुषंगाने बोलताना नितीन वाळके यांनी त्यावेळी वराडकर नावाचे खोत हे आमच्या गावचे असल्याने त्या खोताची हिंसक वृत्ती त्यांच्या विरोधात एकूण समाजात असलेला तीव्र विरोध याचे वर्णन करून बाबासाहेबांच्या एका भेटीने या घटनेची पार्श्वभूमी कशी बदलली हे स्पष्ट केले व अनेक वर्षानंतर या भूमीला भेट देण्याचा योग आल्याने त्याने आनंद व्यक्त केला. भविष्यात नगरपालिकेच्या वतीने येथे भव्य दिव्य स्मारक उभे राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली. शेवटी मोहन जाधव यांनी आभार मानले. यावेळी संजय वेतुलेकर, रमेश बोंद्रे, बाळ बोर्डेकर, तानाजी वाडकर, परमेश्वर सावळे, हरिहर वाटवे, डॉ. विजयालक्ष्मी चिंडक, सीमा मठकर, मूर्ती कासार, साधना तेंडुलकर यांच्यासह सायकल रॅलीतील सायकलपटू उपस्थित होते. यानंतर समाज मंदिर नजीक असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध्या पुतळ्याला पुष्पहार घालून रॅली ओटवणे, बांदा, दोडामार्ग अशी प्रस्थान करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg