वैभववाडी (प्रतिनिधी) - सध्या तालुक्यात तीव्र उन्हाळ्याची झळ जाणवत असून मौदे गावात पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत होता. जलजीवन मिशन अंतर्गत बांधण्यात आलेल्या विहिरीतील गाळ काढून ती स्वच्छ करण्यात आल्याने ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. ठेकेदाराने पुढाकार घेत ही कामगिरी केल्यामुळे ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
मौदे गावात जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. मात्र संबंधित ठेकेदारांची शासकीय बिले रखडल्यामुळे तालुक्यातील इतर गावांप्रमाणे येथेही योजनेचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना अद्यापही नियमित पाणीपुरवठ्याचा लाभ मिळू शकलेला नाही. दरम्यान उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत होती.
ही परिस्थिती लक्षात घेऊन ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदार यांच्याकडे जलजीवन मिशन अंतर्गत बांधण्यात आलेल्या आरसीसी विहिरीतील गाळ काढून ती स्वच्छ करण्याची मागणी केली होती. विहिरीतील पाणी पिण्यासाठी वापरता येईल, असे ग्रामस्थांनी त्यांना सांगितले. ग्रामस्थांची अडचण ओळखून ठेकेदार राजेंद्र कारंडे यांनी तात्काळ पुढाकार घेत संपूर्ण विहीर उपसून तिची स्वच्छता केली. विहिरीतील गाळ काढण्यात आल्याने पाण्याची उपलब्धता वाढली असून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.