loader
Breaking News
Breaking News
Foto

स्वयम शिबे याच्या धाडसाला सलाम, शिवसेनेकडून सत्कार

खेड - खेड शहरालगत असलेल्या खारी पुलाजवळील नदीच्या प्रवाहात वाहून जात असलेल्या "आजी" चे प्राण खेड शहरामधील कुवारसाई येथील रहिवाशी असलेल्या कु. स्वयम शिबे याच्या सतर्कतेमुळे वाचले. एक वयस्कर महिला पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असल्याचे निदर्शनात येताच वेळेचे गांभीर्य ओळखून कु. शिवम याने खारी पुलाजवळील नदीत उडी घेत त्या महिलेला सुखरूपपणे नदीच्या बाहेर आणून जीवदान दिले. त्याच्या या धाडसी कृतीबद्दल कु. स्वयम शिबे या युवकाचा गौरव खेड शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आला. सदर प्रसंगी खेड शहर प्रमुख कुंदन सातपुते, शिवसेना गटनेते निकेतन पाटणे, उपशहर प्रमुख अंकुश विचारे, नगरसेवक स्वप्निल सैतवडेकर, नगरसेवक प्रेमळ चिखले, पराग बांदिवडेकर, कु. रोहन पाडळकर, कु. कृष्णा वनारसे, राहुल शिंदे, कु. कृष्णा माळी व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg