रायगड : सध्या राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने घडामोडींना वेग आला आहे. रायगडमध्ये विधानपरिषदेच्या जागेसाठी मोठी राजकीय डील झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या डीलमुळे आता सुनील तटकरेंचा मुलगा अनिकेत तटकरे यांचा विधानपरिषदेसाठीचा रस्ता मोकळा झाला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने ही नवी खेळी खेळल्याचंही बोललं जात आहे. रायगडच्या जागेवर दावा करणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षासमोर एक नवा प्रस्ताव ठेवल्याची चर्चा आहे.
रायगडची जागा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचा मुलगा अनिकेत तटकरेंसाठी सोडण्यास तयार आहेत. मात्र त्या बदल्यात रायगडचे पालकमंत्री पद हे शिवसेनेकडून मागितल्याची चर्चा आहे. मागील सव्वा वर्षापासून नाशिक आणि रायगडचे पालकमंत्री पद हे रिक्त आहे, शिवसेनेकडून भरत गोगावले यांच्यासाठी तर, राष्ट्रवादीकडून अदिती तटकरे यांच्यासाठी आग्रह धरण्यात येत होता. मात्र, या निवडणूकीच्या निमित्ताने या वादावरच तोडगा काढण्यात आल्याची माहिती सूत्रांची माहिती आहे.
याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेने रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडला असून, खासदार सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा केला आहे. मात्र, हा मतदारसंघ सोडण्याच्या बदल्यात शिवसेनेने राष्ट्रवादीकडून रायगडचे पालकमंत्रिपद पदरात पाडून घेतले आहे. त्यामुळे गेल्या सव्वा वर्षांपासून रिक्त असलेल्या रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या खुर्चीवर आता शिवसेनेचे भरत गोगावले विराजमान होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.






















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.