रत्नागिरी - पावस येथील अनुसया आनंदी महिला वृद्धाश्रम येथे कोंकणी समाज ट्रस्ट एमआयडीसी-मिरजोळे रत्नागिरी यांच्या वतीने धान्य देणगी देऊन सामाजिक आणि संवेदनशील उपक्रम राबविण्यात आला. पवित्र सणाचे औचित्य साधून महिला वृद्धाश्रमातील मातांना धान्याची मदत करण्यात आली. ज्यांच्या त्यागाने आणि संस्कारांनी आपले जीवन घडले, त्या माऊलींच्या चेहर्यावर आनंद आणणे हीच खरी ईश्वरी भक्ती असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही समाजाची खरी ताकद ही त्यांच्यातील सामाजिक जाणिवा आणि संवेदनशीलतेवर अवलंबून असते. ह्याच भावनेतून हा उपक्रम कोंकणी समाज ट्रस्ट च्या वतीने करण्यात आला.
ह्या धान्य देणगी कार्यक्रमाला रत्नागिरीतील वकील, जिल्हा परिषद सदस्य, सामाजिक कार्यकर्ते व रत्नागिरी येथील जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था रत्नागिरी चे जिल्हा अध्यक्ष अॅडव्होकेट महेंद्र मांडवकर, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय वैशंपायन, कोंकणी समाज ट्रस्टचे अध्यक्ष सादीक मुकादम, सचिव मोहसीन मापारी, खजिनदार हुसेनमियाँ (बाबू शेठ) मुकादम, जेष्ठ सदस्य छोटू मेस्त्री, दानिश काळसेकर, फकरूद्दीन आमीनगढ़, शकील सुंबड, रिजवानभाई नदाफ व फैय्याज खतीब व पावस येथील सामाजिक कार्यकर्ते व मेकॅनिक असोसिएशनचे पावस विभाग अध्यक्ष महेश शेठ पालकर उपस्थित होते. संजय वैशंपायन यांच्या वाढदिवसानिमित्त फुलझाडाचे रोपटे देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच अॅड. महेंद्र वसंत मांडवकर यांचा सुध्दा कोंकणी समाज ट्रस्ट च्या वतीने फुलझाडाचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.






















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.