संगमेश्वर (सत्यवान विचारे) - पत्रकारांच्या विविध प्रश्नांना सभागृहात न्याय मिळावा आणि त्यांच्या अडचणी प्रभावीपणे मांडल्या जाव्यात, यासाठी पत्रकारांना स्वतंत्र हक्काचा आमदार मिळावा, अशी मागणी ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड सर्कल (AJFC) संघटनेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष सत्यवान विचारे यांनी केली आहे. प्रत्येक क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे आमदार सभागृहात असतात. शेतकरी, कामगार, शिक्षक, उद्योग क्षेत्रातील प्रश्न मांडण्यासाठी विविध प्रतिनिधी असतात; मात्र लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र प्रतिनिधित्व का नसावे, असा सवाल AJFC या राष्ट्रीय स्तरावर नोंदणीकृत पत्रकार संघटनेने उपस्थित केला आहे. पत्रकारांना काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. ग्रामीण भागातील पत्रकारांच्या सुरक्षेपासून ते मानधन, शासकीय सुविधा, निवास, आरोग्य विमा आणि कायदेशीर संरक्षण अशा विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सभागृहात पत्रकारांचा आवाज पोहोचणे आवश्यक असल्याचेही संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. AJFC संघटनेने पत्रकारांसाठी स्वतंत्र प्रतिनिधित्वाची संकल्पना गांभीर्याने विचारात घेऊन शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.
टाइम्स स्पेशल
सावंतवाडी समता प्रेरणाभूमीला राष्ट्र सेवा दलाच्या सायकल रॅली ची भेट

















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.