सिंधुदुर्ग जिल्हा पतसंस्था फेडरेशन व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सैनिक स्कूल आंबोली येथे आयोजित जिल्हास्तरीय अधिवेशनात विद्यासेवक सहकारी पतसंस्था सावंतवाडीला उत्कृष्ट सहकारी पतसंस्था पुरस्काराने माजी शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. विद्यासेवक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर, संचालक शरद जाधव, विठ्ठल सावंत, हंबीरराव अडकुरकर यांनी सदर पुरस्कार स्विकारला.
याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष तथा सैनिक पतसंस्थेचे सीइओ सुनिल राऊळ, उपाध्यक्ष तथा कॅथोलिक अर्बन पतसंस्थेचे अध्यक्ष जॉय फर्नांडिस, जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे, कोकण पतसंस्था फेडरेशन कार्याध्यक्ष दिपक पटवर्धन, सैनिक पतसंस्थेचे अध्यक्ष बाबुराव कविटकर, सावंतवाडी पतसंस्थेचे अध्यक्ष रमेश बोंद्रे, ॲड समिर वंजारी, महेश्वर कुंभार, जिल्ह्यातील पतसंस्थांचे अध्यक्ष संचालक, कर्मचारी तसेच सैनिक स्कूल आंबोली व सैनिक पतसंस्थेच्या सर्व शाखांचा संपूर्ण स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दोन दिवसीय निवासी अधिवेशनात पतसंस्थेच्या कारभार दर्जेदार चालविण्यासाठी उपयुक्त आदर्श उपविधी, कर्ज वितरण, कर्जवसुली, सायबर क्राइम, कृत्रिम बुद्धिमत्ता, ताणतणाव व्यवस्थापन व समस्यांविषयी खुले चर्चासत्र यावर अनेक तज्ञाचे मार्गदर्शन मिळाले. विद्यासेवक पतसंस्थेच्या उभारणीत व प्रगतीत आजतागायत योगदान दिलेल्या सर्व अध्यक्ष, संचालक मंडळ, प्रशासकीय कामकाजात मदत केलेले अधिकारी, कर्मचारी वृंद, सभासद, ठेवीदार व हितचिंतक या सर्वांच्या परिश्रमाचे हे यश असल्याचे मत अध्यक्ष पांडुरंग काकतकर यांनी व्यक्त केले.

















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.