वेंगुर्ले (वार्ताहर) : शिरोडा-केरवाडी समुद्रात रविवारी पहाटेच्या सुमारास होडी उलटून झालेल्या अपघातात समुद्रात पडून बेपत्ता झालेले खालची केरवाडी येथील मच्छीमार राजन सारंग (४६) यांचा मृतदेह मंगळवारी सकाळी तब्बल 48 तासांनी वायंगणी समुद्र किनारी भागात तरंगताना आढळून आला. याची खबर वायगणीतील कासव मित्र सुहास तोरस्कर यांनी पोलिसांना दिली. शिरोडा-केरवाडी 5 ते 6 वाव खोल समुद्रात रविवारी पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास श्री देवी पावणाई प्रसन्न या होडीने मच्छीमारीसाठी प्रकाश राघोबा सारंग (54), राघोबा प्रकाश सारंग (21) व राजन राघोबा सारंग (46) गेले होते. पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास हे मच्छीमार समुद्रातील मासे पकडण्यासाठी जाळी टाकण्यास सुरुवात केली होती. अन अचानक सुसाट्याचे वादळी वारे तसेच पाऊसही सुरु झाला होता. या वादळी वाऱ्याने समुद्र खवळल्याने समुद्राच्या भल्या मोठ्या लाटा उसळू लागल्या. या लाटांचा मारा प्रकाश सारंग यांच्या होडीवर झाला होता. त्यात होडी पलटी होत समुद्रात बुडाली होती. या अपघातात होडीवरील तिन्ही व्यक्ती समुद्राच्या पाण्यात पडल्या होत्या. त्यातील राघोबा उर्फ दाजी सारंग याने पोहत प्रथम पाण्यावर येत होडीत असलेला व होडी बुडल्याने पाण्यावर तरंगणारी इंधन असलेली सुमारे 25 लिटर क्षमतेची फायबर प्लास्टिक ची मजबुत टाकी पकडली. अन वडील व काका कुठे दिसतात ते पहाण्यास सुरवात केली.
कांही क्षणात त्याचे वडील प्रकाश सारंग हे पाण्यावर आले. त्यांना ही तरंगणाऱ्या इंधन टाकीचा आधार दिला. त्यांच्या होडीपासून कांही अंतरावर कांही होड्या मच्छीमारी करत असल्याचे राघोबा उर्फ दाजी सारंग याने पाहून त्यांना आपल्याला वाचवण्यासाठी जोरजोराने ओरडून आवाज दिला. कपड्याच्या माध्यमातून इशाराही केला. तो इशारा पाहून अनिल मसुरकर यांची होडी आपली मच्छीमार जाळी समुद्रातच ठेवून प्रकाश सारंग यांच्या बुडालेल्या होडी ठिकाणी आली. मसुरकर यांच्या होडी वरील मच्छीमारांनी प्रकाश सारंग व राघोबा उर्फ दाजी सारंग यांना आपल्या होडीत घेत वाचविले. मात्र प्रकाश सारंग यांच्या होडी तिसरा मच्छीमार राजन सारंग त्या परिसरात शोधून सुद्धा आढळला नव्हता. रविवारी पासून सलग दोन दिवस समुद्राच्या पाण्यात पडून बेपत्ता झालेल्या राजन सारंग शोध स्थानिक खालची केरवाडी भागातील मच्छीमारांनी आपल्या होड्या मार्फत सुरु ठेवली होती. तर प्रशासनामार्फत किनारपट्टी वरील सागर सुरक्षा रक्षक, कोतवाल, पोलीस पाटील, व कोस्टल पोलिस यांच्या मार्फत तसेच मत्स्यखात्याच्या माध्यमातून शोध कार्य सुरु होते.
मंगळवारी पहाटे सुमारे 48 तासांनी राजन सारंग याचा मृतदेह वायंगणी समुद्रात किनारी भागात तरंगताना आढळून आला. त्यानुसार पोलीस यंत्रणेस कळविण्यात आले. सदराचा मृतदेह किनाऱ्यावर पोलीस व स्थानिक मच्छीमारांनी किनाऱ्यावर आणला. सदरचा मृतदेह हा शिरोडा-खालची केरवाडी असल्याची ओळख पटली आहे. सदरचा मृतदेह पंचनामा झाल्यानंतर अँब्युलन्सव्दारे रेडी प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेह नेऊन शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर तो मृतदेह अंत्यविधी साठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची खबर शिरोडा केरवाडी येथील वैभव वसंत सारंग यांनी पोलिसांत दिली.






















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.