loader
Breaking News
Breaking News
Foto

बांदा-इन्सुली येथील तपासणी नाक्यावर पोलिसांची कडक नाकाबंदी मोहीम

बांदा (प्रतिनिधी) - आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बांदा-इन्सुली येथील तपासणी नाक्यावर पोलिसांकडून कडक नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली. गोवा राज्यातून येणाऱ्या तसेच गोव्याकडे जाणाऱ्या दोन्ही बाजूंच्या वाहनांची सखोल तपासणी करण्यात येत होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी संशयित वाहनांची तपासणी, कागदपत्रांची पडताळणी तसेच अवैध वाहतूक रोखण्यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली. चारचाकी, दुचाकी, प्रवासी वाहने तसेच मालवाहू वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. या नाकाबंदी मोहिमेत बांदा पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, महसूल विभागाचे कर्मचारी तसेच दंगल नियंत्रण पथक सहभागी झाले होते. परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने वाहनचालकांमध्येही सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले होते.

टाईम्स स्पेशल

यावेळी बांदा पोलीस सहायक निरीक्षक पंकज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कडक नाकाबंदी मोहीम सुरू होती. तसेच नागरिकांनी सण-उत्सव काळात शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg