loader
Breaking News
Breaking News
Foto

​बांदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपाध्यक्षपदी निलेश कदम; उपसभापती गौरव मुळीक यांच्याकडून शुभेच्छा

सावंतवाडी (प्रतिनिधी) : बांदा येथील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपाध्यक्षपदी निलेश कदम यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पुष्पगुच्छ देत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमाचे प्रसारण आज बांदा पानवळ येथील बूथ क्रमांक २१० वर आयोजित करण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमानंतर ही सदिच्छा भेट झाली. 'बांदाचा बाप्पा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मानाच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्याबद्दल निलेश कदम यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ​याप्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, माजी उपसभापती शितल राऊळ, माजी उपसरपंच बाळू मोर्ये, बाळा आकेरकर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, मंडळाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg