loader
Breaking News
Breaking News
Foto

सोनुर्लीतील बाप-लेकाचा गूढ मृत्यू; आई अत्यवस्थ, म्हापसा-करासवाडा येथील घटनेने खळबळ

सावंतवाडी : सोनुर्ली- जाधववाडी येथील जाधव कुटुंबातील बाप-लेकाचा मृतदेह म्हापसा-करासवाडा येथील बंद खोलीत सापडला. बाजूलाच आई अत्यवस्थ स्थितीत आढळली. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. ही सामूहिक आत्महत्या की घातपात, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. अजय देऊ जाधव (वय ३८) आणि त्यांचा मुलगा अथर्व (वय ७) अशी मृतांची नावे असून, पत्नी सुवर्णा (वय ३०) यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर गोव्यातील गोमेकॉ रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्या पूर्ण शुद्धीवर येईपर्यंत या प्रकरणाची उकल होणे कठीण बनले आहे. याबाबत अधिक माहिती अशी: सोनुर्ली येथील अजय जाधव हे पणजीमध्ये गेली काही वर्ष एका खाजगी बँकेत नोकरीला होते. त्यांची पत्नी गृहिणी, तर मुलगा शिक्षण घेत होता. हे कुटुंब म्हापसा-करासवाडा येथील साईनगर भागात एक वर्षापासून भाड्याने खोली घेऊन राहत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कुटुंबाचा संसार सुखात चालला होता; मात्र काल रात्री याला एक गूढ वळण लागले. अजय यांनी सोनुर्ली येथे राहत असलेल्या आपल्या वडिलांना फोन करून, मुलगा आणि बायको झोपत नाहीत, असे सांगितले. यावर वडिलांनी त्यांना देवाचा अंगारा लाव, असे सांगितले. यानंतर वडिलांनी आज सकाळी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. वारंवार फोन करूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी सोनुर्लीतून बस पकडत थेट गोवा गाठले. ते करासवाडा येथे ते राहत असलेल्या खोलीत पोहोचले असता हा सगळा प्रकार उघडकीस आला. त्यांचा मुलगा आणि नातू मृत स्थितीत पडले होते, तर सून अत्यवस्थ असल्याचे आढळून आले. स्थानिकांच्या मदतीने त्यांना गोवा मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले. तेथे अजय आणि अथर्व यांना मृत घोषित करण्यात आले. सुवर्णा यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.

टाईम्स स्पेशल

घटनेची माहिती मिळताच सोनुर्ली गावावर शोककळा पसरली असून अनेकांनी थेट गोवा बांबुळी गाठली. अलिकडेच त्यांचा कुंटूबात एक लग्नसोहळा पार पडला होता. या सोहळ्यात अजय आणि कुंटूबिय आनंदाने सहभागी होते. अजय याच्या कुंटूबाचा स्वभाव हा मनमिळावू होता सर्वाशी मिळून मिसळून राहणार्‍या अजयच्या बाबतीत घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्याचा पश्चात आई, वडील, एक मोठा भाऊ, पुतण्या असा परिवार आहे. सोनुर्ली येथील माजी पोलिस पाटील रामा जाधव यांचा तो पुतण्या तर सोनुर्ली हायस्कुलचे शिपाई संदीप जाधव याचा तो चुलत भाऊ होय.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg