सावंतवाडी : पन्नास वर्ष नाट्य रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या नटश्रेष्ठ बालगंधर्वांच्या जयंती निमित्त सावंतवाडी येथील क्षितिज इव्हेंट या संस्थेने आयोजित केलेल्या ''बालगंधर्व नांदी ते भैरवी" या संगीतमय कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाची संकल्पना बाळ पुराणिक यांची होती, तर निर्मिती श्री परमेश्वर प्रोडक्शन या संस्थेने केली होती. कार्यक्रमाचे उद्घाटन सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गोवा येथील प्रसिद्ध गायक आणि ऑर्गन वादक दामोदर उर्फ भाई शेवडे तसेच नादब्रह्मचे अध्यक्ष शिवानंद भिडे, ज्येष्ठ गायक कलाकार श्रीपाद चोडणकर उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये बालगंधर्वांच्या जन्माच्या वेळची तात्कालीन परिस्थिती त्यानंतर बालगंधर्वांचा रंगभूमीवरील प्रवेश, त्यांनी रंगभूमीवर सादर केलेली नाटके त्यातील लोकप्रिय पदे त्याचप्रमाणे त्यांच्या आयुष्यातील इतर महत्त्वाचे प्रसंग आणि त्यांच्या जीवनाचा उत्तरार्ध असा मांडण्यात आला. कार्यक्रमामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आघाडीचे प्रसिद्ध शास्त्रीय युवा गायक स्वप्निल गोरे आणि गायिका राधा जोशी यांनी गीतांचे सादरीकरण केले. बलसागर तुम्ही वीर शिरोमणी, अरे वेड्या मना तळमळसी, खरा तो प्रेमा, नाथ हा माझा मोही, माडीवर चल ग गडे, अनृताची गोपाला, नयनी लाजवित, मधुकर वन वन फिरत, चिन्मया सकल,अगा वैकुंठिच्या राया आदी अनेक लोकप्रिय नाट्यपदे सादर केली. नाट्यपदे सादर करताना गायकांची तपश्चर्या आणि अभ्यास सादरीकरणातुन दिसत होता.
कार्यक्रमात ऑर्गनची साथ प्रसाद शेवडे, तबला साथ अभिनव जोशी आणि तालवाद्य साथ तेजस प्रभूदेसाई यांनी केली. कार्यक्रमाचे निवेदन बाळ पुराणिक आणि उमा जडये यांनी केले. कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोव्यातील रसिक मंडळी देखील उपस्थित होती.

















































2.jpg)































































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.