loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी स्कूल खेडमध्ये मराठी सुगम संगीत स्पर्धा संपन्न

खेड - रोटरी स्कूल खेडमध्ये मराठी सुगम संगीत स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये शाळेतील 50 विद्यार्थ्यानी उस्फूर्त सहभाग घेतला होता. या संगीत स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी मराठी भावगीत, भक्तीगीत, अभंग, गवळण, पोवाडा इ. गीते सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळवली. सदर स्पर्धा दोन गटात घेण्यात आली होती. त्यामध्ये इ. 3 री ते 6 वी 'अ गटामध्ये' कु. आराध्या आंबेडे - प्रथम क्रमांक रोख रक्कम 1111/-, कु. ईशिता जाधव - व्दितीय क्रमांक रोख रक्कम 777/-, कु. विश्व पवार - तृतीय क्रमांक रोख रक्कम 555/-, कु. अनया पाटिल - उत्तेजनार्थ रोख रक्कम 251/-, तर इ. 7 वी ते 10 वी 'ब गटामध्ये' कु. मीरा खेडेकर - प्रथम क्रमांक रोख रक्कम 1111/-, कु. मृण्मयी दामले - व्दितीय क्रमांक रोख रक्कम 777/-, कु. स्वरा कदम - तृतीय क्रमांक रोख रक्कम 555/-, कु. युवराज देवघरकर - उत्तेजनार्थ रोख रक्कम 251/- पटकावून शाळेचे नाव गौरवित केले. वरील सर्व विद्यार्थ्यांना संगीत विशारद व संगीत अलंका अभिषेक जोशी व सौ. कर्णिका निगडेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg