loader
Breaking News
Breaking News
Foto

बांदा आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची कमतरता; तत्काळ भरतीची मागणी

बांदा (प्रतिनिधी) - बांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत कर्मचाऱ्यांची तीव्र कमतरता भासत असल्याने रुग्णसेवेवर गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे तत्काळ भरती करण्याची मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदन सादर करून केली आहे. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर व कार्यकर्ते उपस्थित होते. बांदा आरोग्य केंद्राच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) दररोज सुमारे २०० ते २५० रुग्ण उपचारासाठी येतात. याशिवाय अपघातग्रस्त व इतर आपत्कालीन रुग्णांचीही संख्या मोठ्या प्रमाणात असते. मात्र, आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना वेळेवर सेवा मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. विशेषतः शिपाई व महिला आरोग्य सेवकांची पदे रिक्त असल्याने कामकाजावर ताण वाढला आहे असे सावंत यांनी सांगितले. सध्या चतुर्थ श्रेणीतील एकूण चार पदांपैकी केवळ दोनच पदे भरलेली असून, त्यातील एक कर्मचारी लवकरच सेवानिवृत्त होणार आहे. त्यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त जबाबदारी येणार आहे. याचा परिणाम स्वच्छता, शिस्त व दैनंदिन आरोग्यसेवेवर होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात किमान दोन शिपाई व आवश्यक महिला आरोग्य सेवकांची तत्काळ नियुक्ती करावी, अशी मागणी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg