संगलट (खेड )(इक्बाल जमादार) - क्रिकेटच्या मैदानावर एखादा गोलंदाज जेव्हा चेंडू स्विंग करायला लागतो, तेव्हा फलंदाजांची दाणादाण उडते; मात्र रत्नागिरीच्या एका युवा गोलंदाजाने असा काही चमत्कार केला आहे की, ज्याची नोंद आता क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी केली जाईल. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनद्वारे आयोजित ‘U-16’ मल्टीडे इन्व्हिटेशन टूर्नामेंटमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा मध्यमगती स्विंग गोलंदाज मुहम्मद सईद शिंग्रे याने एकाच डावात प्रतिस्पर्धी संघाचे सर्वच्या सर्व १० गडी बाद करण्याचा दुर्मिळ पराक्रम केला आहे. कोल्हापूर येथील शासकीय पॉलिटेक्निक मैदानावर ईस्ट झोन विरुद्ध झालेल्या सामन्यात सईदने ही ऐतिहासिक कामगिरी बजावली.
रत्नागिरी विरुद्ध ईस्ट झोन यांच्यात झालेल्या या सामन्यात दुसऱ्या डावात मुहम्मद सईदने आपल्या धारदार स्विंग गोलंदाजीने फलंदाजांना पूर्णपणे निरुत्तर केले. त्याने केवळ ६.५ षटकांच्या स्पेलमध्ये १३ धावा देत १० फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. विशेष म्हणजे, पहिल्या डावातही त्याने ४ बळी घेतले होते, ज्यामुळे संपूर्ण सामन्यात त्याच्या नावावर १४ बळींची नोंद झाली आहे. सईदच्या या भेदक माऱ्यामुळे ईस्ट झोनचा दुसरा डाव अवघ्या ४५ धावांत आटोपला. रत्नागिरी संघाने पहिल्या डावात ३६० आणि दुसऱ्या डावात २३९ धावांचा डोंगर उभा केला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना ईस्ट झोनचे फलंदाज सईदच्या गोलंदाजीसमोर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले आणि रत्नागिरीने ४२२ धावांच्या विशाल फरकाने विजय मिळवला.
एकाच डावात सर्व १० बळी घेण्याची कामगिरी क्रिकेट जगतात अत्यंत दुर्मिळ मानली जाते. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये अनिल कुंबळे, जिम लेकर आणि एजाज पटेल यांसारख्या दिग्गजांनी हा ‘परफेक्ट १०’ चा टप्पा गाठला आहे. आता रत्नागिरीच्या या युवा हिऱ्याने शालेय वयोगटातील क्रिकेटमध्ये हीच पुनरावृत्ती करून आपले नाव त्यांच्या पंक्तीत नेऊन बसवले आहे. रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनसाठी आणि संपूर्ण कोकणासाठी ही अभिमानाची बाब ठरली असून, या ऐतिहासिक कामगिरीबद्दल मुहम्मद सईद शिंग्रे याच्यावर क्रीडा क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या विक्रमी कामगिरीमुळे तो या सामन्याचा मानकरी ठरला असून आगामी काळात रत्नागिरीचा हा खेळाडू मोठी झेप घेईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
















































































































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)












































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.