खेड (दिलीप देवळेकर )- खेड नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारादरम्यान दिलेला शब्द पूर्ण करत नगराध्यक्ष माधवी ताई बुटाला यांनी शहरातील विविध बगीच्यांमध्ये लहान मुलांसाठी खेळणी बसविण्याचे काम पूर्णत्वास नेले आहे. यामुळे शहरातील बालकांसाठी आनंददायी आणि सुरक्षित खेळाची जागा उपलब्ध झाली असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणुकीदरम्यान एका मुलाखतीत बोलताना त्यांनी, "एक स्त्री व आई म्हणून नगराध्यक्ष झाल्यानंतर सर्वप्रथम बगीच्यांमध्ये मुलांसाठी खेळणी उभारण्याचे काम करणार, जेणेकरून प्रत्येक आई व तिच्या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलेल," असे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता करत त्यांनी शहरातील अनेक बगीच्यांमध्ये आकर्षक व सुरक्षित खेळणी बसविण्याची प्रक्रिया पूर्ण केली असून काही ठिकाणी काम अंतिम टप्प्यात आहे.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष माधवी बुटाला यांनी सांगितले की, खेड शहराचा सर्वांगीण विकास शिवसेना नेते रामदासभाई कदम तसेच गृहराज्य मंत्री योगेशदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या गतीने सुरू आहे. शहरातील नागरिकांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत असून त्यासाठी आवश्यक निधीची तरतूदही करण्यात आली आहे. या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी ना. योगेशदादा कदम यांचे विशेष आभार मानले. तसेच खेड शहरातील समस्त महिलावर्गाच्या वतीने आपण प्रतिनिधी म्हणून कृतज्ञता व्यक्त करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
















































































































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)












































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.