loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्यात मुंबईतील बेस्टच्या नंतर ८९ वर्षांनी ठाणे शहरात पहिली डबलडेकर दाखल

ठाणे (अमोल पवार) - राज्यात मुंबई महानगर पालिकेनंतर ठाणे महानगर पालिकेची डबलडेकर बस दोन आठवड्यात रस्त्यावर धावणार आहे. ठाणे परिवहन उपक्रमाच्या (टिएमटी) ताफ्यात एकूण दहा विद्युत वातानुकूलीत डबलडेकर बसगाड्या दाखल होणार असून त्यापैकी पहिली बसगाडी टिएमटीच्या ताफ्यात दाखल झाली आहे. या बसगाडीच्या नोंदणी प्रक्रीयेला एक आठवडा लागणार असून ट्रायल साठी सात दिवस लागणार असून येत्या पंधरा दिवसांत पहिली टी एम टी ची डबल डेकर बस प्रवाश्यासाठी उपलब्ध होणार आहे. पहिली बस तीन हाथ नाका माजिवडा ते घोडबंदर मार्गावर भाईंदर मार्गावर चालविण्यात येणार असल्याची माहिती ठाणे परिवहन सेवेचे व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ठाणे शहरालगत असलेला मुंबईची बेस्टच्या ताफ्यातील डबल डेकर ८९ वर्षांची झाली, इलेक्ट्रीक-डीझेल ते पुन्हा इलेक्ट्रीक डबल डेकरचा प्रवास विशेष म्हणजे 1920 मध्ये पहिली ट्राम इलेक्टीक डबल डेकर मुंबईत धावली होती. तर त्यानंतर 1937 मध्ये इंधनावरील मोटर डबल डेकर सेवेत आली, आता नव्या वर्षात पुन्हा इलेक्ट्रीक डबल डेकर सेवेत आली आहे. राज्यातमुंबई नंतर ठाण्यात डबल डेकर बस यायला ८९ वर्षाचा पल्ला गाठायला लागला आहे. ठाणे परिवहन सेवेत(टिएमटीच्या) ताफ्यात ४०७ बसगाड्या असून त्यापैकी ३८१ बसगाड्या प्रवासी सेवेसाठी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. आगामी काळात टिएमटीच्या ताफ्यात ३७० नवीन बसगाड्या दाखल होणार आहेत. या बसगाड्या वर्षाअखेरपर्यंत दाखल होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. यात पीएम ई बस योजनेतून १०० वातानुकूलीत विद्युत बसगाड्या, १५ व्या वित्त आयोगातून १६० वातानुकूलीत विद्युत बसगाड्या, १०० सीएनजी, १० डबलडेकर बसगाड्यांचा समावेश आहे. यामुळे बसगाड्यांची संख्या ७७७ इतकी होणार आहे.

टाईम्स स्पेशल

तात्काळ आयुक्त अभिजित बांगर असताना दोन वर्षापूर्वी प्रशासनाने ठाण्यात डबलडेकर बसेस अर्थसंकल्पात मजुरी दिली होती त्याला सर्वसाधारण सभेने मान्यता दिल्यानंतर या बसगाड्या खरेदीचा मार्ग मोकळा झाला होता. टिएमटीच्या ताफ्यात एकूण १० विद्युत वातानुकूलीत डबलडेकर बसगाड्या दाखल होणार असून त्यापैकी पहिली बसगाडी गुरूवारी घोडबंदर येथील आनंदनगर आगारात दाखल झाली. १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त ही बसगाडीचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे गुरुवारी पहिली डबलडेकर बस टीमटी च्या ताफ्यात दाखल झाली असून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दुसरी बस दाखल होणार आहे. सहा महिन्यात टप्याटप्याने दहा बसेस दाखल होणार असल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनी दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg