loader
Breaking News
Breaking News
Foto

संगलट गावचे सुपूत्र डॉ.मेहरान मन्सुर नाडकर यांचे एम.बी.बी.एस. परिक्षेत यश

खेड (प्रतिनिधी) - खेडचे माजी उपसभापती मन्सुर इस्माईल नाडकर यांचे सुपूत्र व खेडचे नाडकर हॉस्पीटलचे डॉ.आदम हुसैन नाडकर यांचे नातु डॉ. मेहरान मन्सुर नाडकर यांनी एमबीबीएस परिक्षेत यश प्राप्त केले आहे. डॉ. मेहरान मन्सुर नाडकर यांचे सुरुवातीचे शाळेय शिक्षण एल.टी. टी इंग्लीश मिडीयम स्कुल खेड येथे झाले. लहानपणापासून त्याची डॉक्टर बनण्याची इच्छा होती तो अत्यंत अभ्यासू, शिस्त प्रिय, मेहनती व हुशार विद्यार्थी होता. डॉक्टर बनण्याची जिद्द व चिकाटी या जोरावर पूर्ण करू शकला. वैद्यकीय शिक्षण कृष्णा विश्व विद्यापीठ कराड मध्ये झाले. या पूर्वी त्याची बहीन डॉ. मुस्कान मन्सुर नाडकर हिने देखील एम बी बी एस परिक्षेत यश संपादन केले आहे या यशात त्याची आई नाझनीन मन्सुर नाडकर घ्यांनी खूप परिश्रम घेतले. डॉ. मेहरान हे एम बी बी.एस पास झाल्याने संगलट गावामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यांच्या या यशाबद्दल शिवसेना नेते महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री रामदास भाई कदम, महाराष्ट्र राज्याचे गृहराज्य मंत्री योगेश दादा कदम जि. प. सदस्य अण्णा कदम, माजी आमदार संजयराव कदम, जिल्हाप्रमुख शशीकांत चव्हाण, सभापती सिकंदर जसनाईक डॉ.आदम हुसैन नाडकर काका फारूक इस्माईल नाडकर आणि संगलट गावच्या सर्व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg