loader
Breaking News
Breaking News
Foto

देवळे फाट्यावर उभ्या रिक्षाला धडक देऊन फरार झालेल्या वाहन चालकाला दोन तासात पकडले

देवळे (प्रकाश चाळके) - रत्नागिरी नागपूर रस्त्यावरील देवळे फाट्यावर उभ्या रिक्षाला मागून धडक देऊन रिक्षा चालकाच्या मृत्यूस जबाबदार असलेला फरार वाहनाचालकाला देवरुख व साखरपा पोलीस यंत्रणेने अवघ्या काही तासात आंबा येथे पकडले. देवळे फाट्यावर पॅसेंजरची वाट बघत असलेल्या रिक्षाचालक विजय पांडुरंग कांबळे, वय ६२ यांच्या उभ्या असलेल्या रिक्षाला मागून धडक देऊन सुमारे दहा फूट रिक्षा फरफटत नेत विजय कांबळे यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेला फरार वाहन चालक व वाहन एमएच-०९-जीए-६८८६ यांना देवरुख पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून चेकिंग करून आंबा घाट येथे अवघ्या काही तासातच ताब्यात घेतले. देवरुख पोलीस निरीक्षक उदय झावरे, साखरपा दुरक्षेत्राचे पोलीस निरीक्षक साखरपा प्रमोद वाघाटे, सहायक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे, पोलीस हवालदार सचिन कामेरकर, पोलीस हवालदार सचिन पवार यांनी काम पाहिले असून तालुक्यातून पोलीस यंत्रणेबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg