loader
Breaking News
Breaking News
Foto

वैभववाडी-फोंडा रस्त्यालगत भीषण आग

वैभववाडी (प्रतिनिधी) - वैभववाडी-फोंडा रस्त्यालगत लागलेली भीषण आग ग्रामस्थ, वैभववाडीचे सरपंच अजय रावराणे आणि वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. डॉ. विजय पैठणे यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे वेळीच आटोक्यात आली. या परिसरामध्ये दुर्मिळ वनस्पती व ऑर्किड्सच्या प्रजातींचा अधिवास असल्याने, या आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्यामुळे मोठी पर्यावरणीय हानी टळली आहे. प्रा. डॉ. विजय पैठणे हे वैभववाडीहून कणकवलीकडे आपल्या घरी जात असताना त्यांना रस्त्यालगत वणवा लागल्याचे दिसले. पर्यावरणाच्या आणि निसर्गाच्या ओढीमुळे ते तातडीने गाडीवरून खाली उतरले. त्यांनी आग विझवण्यास सुरुवात केली, त्याच वेळी वैभववाडीचे सरपंच अजय रावराणे आणि परिसरातील स्थानिक ग्रामस्थही घटनास्थळी दाखल झाले. या सर्वांनी मिळून झाडांच्या हिरव्या फांद्यांच्या साहाय्याने आगीचे लोळ झोडपून काढत काही वेळातच आग पूर्णपणे आटोक्यात आणली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वैभववाडी आणि परिसरातील हा भाग अनेक दुर्मिळ वनस्पती आणि विविध प्रकारच्या ऑर्किड्सच्या प्रजातींसाठी ओळखला जातो. या ठिकाणी कार्य करणाऱ्या आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. विजय पैठणे हे गेल्या अनेक वर्षांपासून वनसंवर्धन आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळणाऱ्या दुर्मिळ वनस्पतींवर संशोधन करत आहेत. या आगीवर नियंत्रण मिळविल्यामुळे या परिसरातील समृद्ध जैवविविधतेचे रक्षण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी दाखवलेल्या या समयसूचकतेचे व पर्यावरणप्रेमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ​

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg