दापोली (सागर गोवळे) : पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जाणाऱ्या दापोली तालुक्याला गेल्या काही दिवसांपासून तीव्र वीज संकटाचा सामना करावा लागत आहे. महावितरण कंपनीकडून वारंवार आणि विनासूचना खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे स्थानिक नागरिक, व्यापारी आणि पर्यटकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या समस्येविरोधात आता दापोलीकर आक्रमक झाले असून, येत्या शुक्रवारी महावितरण कार्यालयावर धडक देण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला आहे. दापोली हा कोकणातील प्रमुख पर्यटन तालुका असल्याने सध्याच्या सुट्ट्यांच्या हंगामात येथे हजारो पर्यटक हजेरी लावत आहेत. मात्र, सततच्या वीज गुल होण्यामुळे हॉटेल व रिसॉर्ट व्यावसायिक अडचणीत आले असून पर्यटकांना सुविधा देणे कठीण झाले आहे.
फळ प्रक्रिया उद्योग आणि स्थानिक दुकानदारांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन कमालीचे विस्कळीत झाले आहे. "ऐन पर्यटन हंगामात वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने दापोलीच्या पर्यटन प्रतिमेला मोठा धक्का बसत आहे. यामुळे व्यवसायावर तर परिणाम होत आहेच, शिवाय पर्यटकांमध्येही नाराजीचा सूर आहे." अशी भावना स्थानिक व्यावसायिकांनी व्यक्त केली. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराला जाब विचारण्यासाठी तालुक्यातील सर्व पर्यटन व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक आणि नागरिक एकत्र आले आहेत. आपल्या मागण्या महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एकजूट करण्यात आली आहे.
दिनांक शुक्रवार, २९ मे २०२६ सकाळी १०.०० वाजता महावितरण कार्यालय, दापोली “आपल्या हक्कासाठी, आपल्या भविष्यांसाठी” हे घोषवाक्य घेऊन दापोलीकरांनी या आंदोलनाची हाक दिली आहे. प्रशासनाला जागे करण्यासाठी आणि अखंडित वीज पुरवठ्याची मागणी लावून धरण्यासाठी तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी, व्यावसायिकांनी शुक्रवारी सकाळी १० वाजता दापोली महावितरण कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समन्वयकांकडून करण्यात आले आहे.






















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.