loader
Breaking News
Breaking News
Foto

पाऊस नाही, तरीही वीज गायब; दापोलीकर हैराण

दापोली (सागर गोवळे) : उन्हाळा असो वा पावसाळा, आमचा वीज पुरवठा मात्र नेहमीच पांगळा! सध्या दापोलीकर महावितरणच्या कारभारावर नेमके याच शब्दांत तोंडसुख घेत आहेत. आधीच मे महिन्याचा जीवघेणा उकाडा, त्यात रात्रीच्या वेळी अचानक ’गुल’ होणारी लाईट यामुळे दापोली शहर आणि परिसरातील नागरिक पुरते हैराण झाले आहेत. काल रात्रीही असाच काहीसा प्रकार घडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोली सब-स्टेशन अंतर्गत ३३ केव्हीच्या दोन्ही विद्युत वाहिन्यांमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि संपूर्ण परिसर अंधारात बुडाला. महावितरणने नेहमीप्रमाणे बिघाड शोधून दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे, १ तासात वीज येईल असा मेसेज फिरवून आपली जबाबदारी पार पाडली. पण नागरिकांच्या संतापाचा पारा मात्र यामुळे चांगलाच चढला आहे. पावसाळ्यापूर्वीच ही अवस्था, मग पावसाळ्यात काय होणार? अजून मान्सूनचे साधे आगमनही झाले नाही, तोवरच दोन्ही वाहिन्या एकाच वेळी निकामी होतात. मग प्रत्यक्ष पावसाळ्यात वीज पुरवठा अखंडित राहणार की रोज मेणबत्त्या पेटवाव्या लागणार?

टाईम्स स्पेशल

रात्रीचाच ’मुहूर्त’ का सापडतो? दिवसभर कसाबसा उकाडा सहन केल्यानंतर रात्री सुखाची झोप घेण्याच्या वेळेसच लाईट का जाते? लहान मुले, वृद्ध आणि आजारी माणसांचे हाल महावितरणला दिसत नाहीत का? मान्सूनपूर्व कामे झाली कुठे? दरवर्षी पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च केले जातात, मग हे बिघाड उन्हाळ्यातच कसे काय उद्भवतात? की ही फक्त वरवरची मलमपट्टी आहे? दर उन्हाळ्यात रात्रीच्या वेळी लाईट जाणे हा आता नियमच बनला आहे. जर पावसाळ्याआधीच ही परिस्थिती असेल, तर पावसाळ्यात झाड पडले किंवा वारा सुटला की आठ-आठ दिवस अंधारात राहावे लागणार का?

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg