loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण नगरपालिकेच्या वतीने रेवताळे भागात स्वच्छता अभियानात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण (प्रतिनिधी) - मालवण नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील रेवतळे, आदर्शनगर व रेडकर हॉस्पिटल रोड या परिसरात आज शनिवारी सकाळी ७ ते ९ या वेळेत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ही स्वच्छता मोहीम आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी नगरसेविका अनिता गिरकर तसेच अन्य मान्यवर सदस्य उपस्थित होते. या मोहिमेत आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच सफाई कर्मचाऱ्यांनी परिसरातील कचरा, झाडझुडपे व इतर अस्वच्छता दूर करून स्वच्छता केली. या उपक्रमास स्थानिक नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वच्छता अभियानात सहभाग नोंदविला.

टाईम्स स्पेशल

यापुढेही शहरातील प्रत्येक विभागात अशाच प्रकारे विशेष स्वच्छता मोहिमा राबविण्याचे नियोजन आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, शहर स्वच्छ, सुंदर व निरोगी ठेवण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन मालवण नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg