loader
Breaking News
Breaking News
Foto

सलाम त्या जिद्दीला! हत्तीने उद्ध्वस्त केलेल्या जागी काजूचे रोप लावून शेतकऱ्याने दिला नव्या आशेचा संदेश

तिलारी (प्रतिनिधी) : कोलझर परिसरात रानटी हत्तीच्या हल्ल्यात सुमारे 20 वर्षांचे फळधारणा करणारे नारळाचे झाड उद्ध्वस्त झाले. या घटनेमुळे मोठे आर्थिक नुकसान होऊनही खचून न जाता शेतकरी सिद्धेश देसाई यांनी त्याच ठिकाणी काजूचे रोप लावून जिद्द आणि सकारात्मकतेचा आदर्श घालून दिला. हत्तीमुळे तोंडचा घास हिरावला गेला असला तरी संकटासमोर न झुकता पुन्हा नव्याने उभे राहण्याचा निर्धार देसाई कुटुंबाने कृतीतून दाखवून दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते बाबू गवस यांनी देसाई कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच शासनाकडून योग्य नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावेळी नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी करण्यात आली. पाहणीदरम्यान बाबू गवस यांच्यासह विलास सावळ उपस्थित होते. हत्तीच्या वाढत्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण आणि नुकसानभरपाईची प्रक्रिया अधिक जलद व प्रभावी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

संकट कितीही मोठे असले तरी हार न मानता नव्या उमेदीनं पुन्हा सुरुवात करण्याचा संदेश देसाई कुटुंबाच्या या कृतीतून मिळत असून, त्यांच्या जिद्दीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg